देवळा : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज सोमवारपासून (दि.५) नियमितपणे सुरू होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा फटका बाजार समित्यांना बसला होता. समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव बंद झाल्यामुळे शेतीमालाची विक्री कोठे करावयाची? या विवंचनेत शेतकरी सापडले होते. एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा बाजारात विक्रिसाठी शेतकरी आणतात. यातून आगामी खरीप हंगामासाठी आर्थिक नियोजन शेतकऱ्यांना करावयाचे असते.परंतु बाजार समिती बंद असल्यामुळे कांदा रोखला गेला व बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले तेव्हा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजार भावात घसरण झाली. सद्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनता कर्फ्यू पुकारण्यात आला असून सर्व व्यवसाय ठप्प आहेत.यामुळे गतवर्षासारखीच परीस्थिती चालू वर्षी पुन्हा निर्माण होते कि काय?ह्या चिंतेत शेतकरी पडले होते. परंतु सोमवारपासून बाजार समितीत लिलाव नियमितपणे सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोट...शेतकरी बांधवानी कांदा शेतमालाची प्रतवारी करून लिलाव आवारात विक्रीस आणावा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या चेहऱ्यावर मास्क बांधणे आवश्यक आहे. मास्क नसल्यास आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव आवारात असतांना मास्क नसल्यास त्या व्यक्तीकडून २०० रुपये दंड आकारण्यात येईल.- माणिक निकम, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा.बाजार समितीत लिलाव बंद झाल्यास नुकसान शेतकऱ्यांचे होते. नंतर आवक वाढून बाजार भाव कोसळतात. चालू वर्षी महागडे उन्हाळी कांदा बियाणे विकत घेतले असून उत्पादन खर्च खूप वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीत शेतीमालाचे लिलाव बंद होणार नाहीत याची शासनाने काळजी घ्यावी.- संग्राम देवरे, कांदा उत्पादक, वाजगाव.
आजपासून कांदा लिलाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 9:20 PM
देवळा : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज सोमवारपासून (दि.५) नियमितपणे सुरू होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देदेवळा : शेतकरी वर्गात समाधान