नाशिक : जिल्ह्यातील कांदा व्यापाºयावर गुरुवारी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यानंतर लिलावात कांद्याचे भाव सुमारे ३० टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे शुक्रवारी काय भाव निघतात, याकडे लक्ष लागून होते, परंतु छाप्यांच्या निषेधार्थ व्यापा-यांनी लिलावांवर बहिष्कार घातल्याने, व्यवहार ठप्प झाले. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्याप तरी चढेच आहेत.वर्षभरापासून गडगडणा-या कांदा दराने अलीकडेच उसळी घेत, अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता. भाव वाढल्याने शेतक-यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने, केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली.इजिप्तमधून कांदा आयातीचा निर्णय हा त्याचाच एक भाग. कांदा आयातीची माहिती पसरल्याने बाजार समिती आवारात भाव कमी होतील, या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत. अचानक आवक वाढल्याने, चालू सप्ताहात दर सुमारे ७०० ते ८०० रुपयांनी खाली आले.एकीकडे ही परिस्थिती असताना गुरुवारी प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील बड्या कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. या छापेमारीमुळे गुरुवारी सकाळी बाजार समित्यांमध्ये आलेल्या कांद्याचे लिलाव झाले नाहीत. दुपारनंतर लिलाव सुरू झाले, तरी व्यापाºयांनी थेट ५०० रुपये कमी भाव पुकारण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांचा संताप झाला. काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले.दुस-या दिवशीही चौकशीप्राप्तिकर विभागातर्फे शुक्रवारी दुसºया दिवशीही लासलगावमधील दोन्ही कांदा व्यापाºयांची चौकशी सुरू होती. व्यापाºयांनी किती कांदा खरेदी केली, याबाबत अधिकाºयांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून माहिती घेतली. त्यामुळे इतर व्यापाºयांची चिंता वाढली आहे. कांद्यासह इतर शेतमालाची साठेबाजी करणाºया व्यपाºयांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर राहणार असल्याची माहिती पुण्यातील प्राप्तीकरच्या सूत्रांनी दिली आहे.
कांद्याचे लिलाव ठप्पच, व्यापा-यांत धास्ती; प्राप्तिकरच्या छाप्यानंतर भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 4:18 AM