उमराणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. गिरणारे येथील शेतकरी बापू भिमराव खैरनार यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ४१११ रु पये भाव मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर नविन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. त्या रिवाजाप्रमाणे यावर्षीही सकाळी दहा वाजता नविन लाल कांदा खरेदी विक्र ीचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम समितीच्या कार्यालयातील देव देवताच्या प्रतिमेचे पुजन कांदा व्यापारी सुनिल दत्तु देवरे, बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते बैलगाडीतुन विक्र ीस आलेल्या नविन कांद्याचे पुजन करु न कांदा उत्पादक शेतकरी बापू खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर लाल शुभारंभ होऊन लिलावास सुरु वात करण्यात आली. यावेळी गजानन आडतचे संचालक व कांदा व्यापारी संजय खंडेराव देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत ४ हजार १११ रु पये दराने नविन लाल कांदा खरेदी केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम व सर्वोच्च दराने कांदा खरेदी करण्याचा बहुमान त्यांनीच राखला. शुभारंभाप्रसंगी कांदा व्यापारी प्रविणलाल बाफणा, संदेश बाफणा, साहेबराव देवरे, रामराव ठाकरे, शैलेश देवरे, महेंद्र मोदी, सुनिल देवरे, प्रविण देवरे, मुन्ना अहेर, पांडुरंग देवरे, रमेश वाघ, अविनाश देवरे, मोहन अिहरे, सचिन देवरे, समतिीचे सचिव नितिन जाधव, सहसचिव तुषार गायकवाड तसेच बहुसंख्य व्यापारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
उमराणेत कांद्याला ४१११ रूपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 2:04 PM