खामखेडा : विहिरीच्या पाण्याची पातळी घटल्याने शेतातील लागवड केलेला कांदा पीक पाण्याअभावी करपू लागल्याने कांदा, गहू, हरभरा आदि पिके सोडण्याची वेळ खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.खामखेडा परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. सर्वाधिक कांदा पिकवणारा भाग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी दिवसोंदिवस कमी होत चालले आहे. पूर्वी गिरणा नदी बारमाही दुथडी भरून वाहत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना बॅँक, सोसायटीकडून कर्ज काढून गिरणा नदीच्या काठावरून पाइपलाइन करून शेतीसाठी पाणी नेले. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून कमी पावसामुळे एकेकाळी दुथडी भरून वाहणारी गिरणा नदीचे पात्र पावसाळ्यातही पूर येत नाही. नदीचे पात्र नोहेंबर महिन्यात कोरडी होते. त्यामुळे नदीपात्र पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या विहिरींना पाणी राहत नाही. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतीतील पिके सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)
खामखेडा परिसरात कांदा पीक करपले
By admin | Published: January 16, 2016 10:10 PM