नाशिक : जिल्ह्यात कांदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निमार्ण झाला असून बियाण्यांच्या शोधासाठी शेतक?्यांची गावोगाव भटकंती सुरु असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शास्वती मिळत नसल्याने ते घेण्याबाबत शेतक?्यांमध्ये संभ्रमावस्था निमार्ण झाली आहे. बियाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात यावषर्प ५० हजार हेक्टरवरील कांदा लागवड घटण्याचा अंदाज वर्तिवला जात आहे. पयार्ने उत्पादन घटण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.महाराष्ट्राच्या एकुण कांदा उत्पादनापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात ५० टक्के कांदा उत्पादन होते. सटाना, मालेगाव, चांदवड, येवला, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये प्रामुखयाने कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप, लेट खरीप आणि रब्बी (उन्हाळ) अशा तीन हंगामात कांदागवड केली जाते. सध्या उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी बियाण्याचा शोध घेत आहेत. गतवषी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने अनेकांना घरचे बियाणे तयार करता आले नाही. ज्यांच्यकडे बियाणे होते त्यांना निसगार्ने साथ दिली नाही. यामुळे रोपांचे मोठप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे यावषर्प कांदा बियाण्याला मोठया प्रमाणात भाव वाढला असून दहा हजारांपासून १५ हजार रुपये पायलीपर्यंत दर गेल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याशिवाय बियाणे उत्पादक कंपण्यांकडेही यावषर्प बियाणे उपलब्ध नसल्याने यावषर्प कांदा लागवडीत पयार्याने उत्पादनातही घट निमार्ण होण्याची शक्यता वर्तिवली जात आहे.एक हेक्टरवरील कांदा लागवडीसाठी साधारणत १० किलो बियाणे लागते. ८० ते ८५ टक्के शेतकरी घरचे बियाणे वापरतात तर १० ते २० टक्के शेतकरी कंपण्यांच्या बियाण्याला पसंती देतात. मागीलवषर्प जिल्ह्यात २ लाख ७५ हजार क्वतिंटल बियाणे उपलब्ध होते. गतवषर्प एक लाख ७१ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. पुढील वषर्पच्या बियाण्यासाठी साधारणत आॅक्टोंबर नोव्हेंबर मध्ये लागवड केली जाते मात्र गतवषर्प कांद्याला भाव चांगला असल्यामुळे शेतक?्यांनी बहुसंख्य कांदा विकला त्यामुळे अनेकांना बियाणे तयार करता आले नाही. अकोला आणि बुलढाणा परीसरात कांदा बिजोत्पाद होते मात्र गतवषर्प तिकडे गारपीट झाल्याने तीकडेही उत्पादन कमी झाल्याने यावषर्प कांदा बियाण्याची टंचाई निमार्ण झाली असून ५० हजार हेक्टरवरील लागवडीवर त्याचा परीणाम होण्याचा अंदाज आहे.