येवला : येवला व अंदरसुल बाजार समितीत शनिवारी लाल कांद्याची आवक १२ हजार क्विंटल झाली असून गेल्या दोन दिवसात १२०० रु पये प्रतीक्विंटल भाव घसरले. आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आपल्या शेतातील लाल कांदा मार्केटला आणण्याची घाई करीत आहे. येवल्यासह कांद्याचे भाव घसरणीला लागले असले तरी दिल्लीसह देशभरात कांदाभाव मात्र तेजीतच असल्याचे चित्र दिसत आहे. येवला बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शनिवारी साठवणीच्या उन्हाळ कांद्यासह नवीन लाल कांद्याची आवक १२ हजार क्विंटल झाली आहे. अंतिम टप्प्यातीलत साठवणीचा शिल्लक पाच टक्के उन्हाळ कांदा आणि नव्याने येवू घातलेला लाल कांदा अशा दोन्ही कांद्यांची आवक जोरदार चालू झाल्याने बाजारभाव घसरल्याचे चित्र दिसत आहे.शनिवारी येवला मार्केटमध्ये ९५ टक्के लालकांदा दिसत होता. येवला व अंदरसूल बाजार आवारात ३०० ट्रँक्टर आणि ६५० रिक्षापिकअप मधून सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.येवला बाजार आवारात नवीन लाल कांद्याला किमान १००० रु पये, कमाल२५२१ तर सरसरी २२०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.ही भावातील लक्षणीय घट आहे. अंदरसूल उपबाजारात लाल कांद्याला किमान १४५१ रु पये, कमाल २५६० तर सरसरी २१०० रु पये भाव मिळाल्याची माहिती बाजार समतिीचे सचिव डी.सी.खैरनार यांनी दिली. गेल्या दहा दिवसापूर्वी कांद्याला ४४४४ रु पये प्रतीक्विंटल भाव मिळाला होता.आण िसध्या सरासरी २१०० रु पये प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. येवला तालुक्यात शेतकर्याच्या चाळीतील उन्हाळ कांदा केवळ १० ते १५ हजार क्विंटल कांदा शिल्लक आहे.हा उन्हाळ कांदा आता वेगाने बाहेर येत आहे.लाल कांद्याची आवक निरंतर वाढून आता भावात आणखी घसरण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे.
येवल्यात कांदा घसरला, भाव सरासरी २१०० रु पये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:43 PM