येवला : मार्च महिना लागला अन् होळीची चाहुल लागली. यात उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर लाल कांद्याच्या आवकेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले; मात्र बाजारभाव स्थिर होते.कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदि राज्यांत तसेच परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर आदि ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. हरभरा : सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव स्थिर होते. मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण २३२ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान ४१०० ते कमाल सहा हजार रुपये होते. सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत होते.तूर : सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली; मात्र बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची एकूण ८२ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान ३२०० ते कमाल चार हजार रुपये होते. सरासरी ३८०० रुपयांपर्यंत होते.सोयाबीन : सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र होते. सोयाबीनला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण १२५ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान २५००ते कमाल २७५१ रुपये होते. सरासरी २७०० रुपयांपर्यंत होते.मका : सप्ताहात मका पिकाच्या आवकेत घट झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मकाची एकूण ४४७७ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १३४० ते कमाल १३६८ रुपये होते, तर सरासरी भाव १३५० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार यांनी दिली. (वार्ताहर )
येवला बाजार समितीत कांदा आवकेत वाढ
By admin | Published: March 06, 2017 12:05 AM