शेखर देसाईलासलगांव : जगभरात सर्वत्र कोरोनाचं थैमान सद्या सुरू असून त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोरोना चा फटका कांदा निर्यातीस सुद्धा बसला असून त्याचा परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे.15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे.सद्या लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीच्या आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येत असल्यामुळे बाजार भावात घसरण होत आहे.कोरोनामुळे परदेशातून कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे.मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तेव्हा केंद्र सरकारने 29 सप्टेंबर 2018 ला तात्काळ कांदा निर्यात बंदी घातली याचा मोठा फटका कांदा निर्यातीला 385 कोटीचे परकीय चलनाला बसला.एप्रिल 19 ते डिसेंबर 2019 पर्यंत देशातून नऊ लाख 82 हजार मेट्रिक टन कांदा निर्णय झाला असून एप्रिल 18 ते डिसेंबर 2018 च्या तुलनेत पस्तीस टक्के 35 % कांदा निर्यात घसरली आहे.केंद्र शासनाने कांदा दरावर नियंत्रण आणण्यासाठी निर्यात बंदी व व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा घालून भाव स्थिर राहण्यासाठी प्रयत्न केला.तब्बल पाच महिने कांदा निर्यात बंदी राहिल्याने कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली अखेर केंद्र सरकारने कांदा भावातील घसरण थांबवण्यासाठी 15 मार्च 2020 ला निर्यात बंदी उठवली मात्र याचा परिणाम देशातील कांदा निर्यातीला बसला असून माहे एप्रिल 19 ते डिसेंबर 2019 देशात नऊ लाख 82 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला त्यात भारताला 1919 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. मागील वर्षी एप्रिल 18 ते डिसेंबर 2018 या काळात देशातून पंधरा लाख 22 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन यातून 2304 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत 35 टक्के घट होऊन ३385 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले नाही.2018-19 या वर्षात 21,83,767 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असुन त्यातुनरु,3,46,887 लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले. तर 2019-2020 ला 9,82,471मेट्रिक टन कांदा निर्यात झाला त्यातून 1,91,898 लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले.त्यामुळे लॉकडाऊन मुळे मागील वर्षाच्या तुलनेत 1,54, 998 लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले नाही.भारतातून 76 देशांना कांदा निर्यात केला जातो त्यात प्रामुख्याने बांगलादेश,मलेशिया,श्रीलंका,संयुक्त अरब, नेपाळ,सिंगापूर,कतार,इंडोनेशिया,कुवेत,मॉरॅशिश,सौदी अरेबिया,ओमान,होंगकोंग,पाकिस्तान,इटली,कॅनडा, रशिया,ग्रीस,यु.के.या देशांना निर्यात होते तर अफगाणिस्थान,इजिप्त,व्हिएतनाम,बांगलादेश,चीन,इराण, पाकिस्तान,थायलंड तेथून कांदा आयात केला जातो.निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी.......लॉकडाऊन मुळे लोडींग-अनलोडींग करण्यासाठी अपुरा कामगार वर्ग,निर्यातीसाठी सबसिडी( ट.ए.क.र.)कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद आहे ती चालू केली तर निर्यातदार जास्तीत-जास्त निर्यात करेल याचा फायदा कांदा भावाला होईल.ट्रान्सपोर्ट सबसिडी दिली तर देशात व परदेशात माल पाठविण्याचे प्रमाण वाढेल.जून महिन्यात शिथिल होणारे लॉकडाऊन हॉटेल,मॉल, मंगलकार्यालय अदि ठिकाणी मागणी वाढेल.परदेशात लॉकडाऊन असल्याने मालाला पाहिजे तेवढा ऊठाव नाही.उन्हाळ कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे.गेल्या अडीच महिन्यापासून लॉक डाऊन आहे.त्यामुळे कांद्याचा निकास कमी प्रमाणात झाला.कांदा निर्यात प्रोत्साहन योजना ट्रान्सपोर्ट सबसिडी यासारख्या योजना राबवून निर्यात खर्चात बचत होऊन पर्यायाने भविष्यात येणारे कांद्याचे संकट टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करावी.- मनोज जैन, कांदा निर्यातदार.चालू वर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे, मात्र लॉकडाऊन मुळे देशांतर्गत व परदेशांत मागणी कमी असल्याने संथ गतीने निर्यात सुरू आहे.संपूर्ण लॉक डाऊन उठल्यानंतर केंद्र शासनाने निर्यात वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल.- नरेंद्र वाढवणे, सचिव,लासलगांव बाजार समिती.