पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.३) उन्हाळ कांद्याचे दर जवळपास १३२० रु पयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू दिसून आला.केंद्र सरकारकडून कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यात बंदी बंदी केली. मात्र परराज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे ४० टक्के नुकसान झाले. परिणामी कांदा आवक घटल्याने कांदा बाजारभाव दिवसागणिक वधारत होते. मात्र शनिवारी (दि.३) कांदा दरात सुमारे १३२० रुपयांनी घसरल्याने निर्यात बंदीचा परिणाम मात्र दरावर दिसून येत असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.पिंपळगाव बाजार समितीत गुरु वारी (दि. १) उन्हाळ कांद्याला चालू वर्षातील ५८०१ रु पये क्विंटल उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकºयांना काही अंशी दिलासा लाभला होता. शनिवारी (दि.३) बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १२ हजार २५० क्विंटल आवक झाली. त्यास जास्तीत जास्त ४४८१, कमीत कमी १५००, तर सरासरी ३१०० रूपये दर मिळाला. चालू सप्ताहातील गुरु वारच्या तुलनेने शनिवारी कांदा दर जवळपास १३२० रु पयांनी गडगडल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळाला.
पिंपळगाव बाजार समितीत कांदा १३२० रुपयांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 7:28 PM
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.३) उन्हाळ कांद्याचे दर जवळपास १३२० रु पयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू दिसून आला.
ठळक मुद्देभाव ४४८१ तर आवक १२२५०