पाटोदा : दिवाळीपूर्वी आठ-नऊ रु पये किलो दराने विक्र ी होणारा उन्हाळ कांदा सध्या एक-दीड रु पये किलोपेक्षाही कमी भावात विकावा लागत असल्याने व वाहतुकीचा, मजुरीचा खर्चही खिशातून द्यावा लागत असल्याने येथील शेतकरी पोपट जाधव यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला आहे.भाव वाढतील या आशेवर जाधव यांनी आठ-दहा महिन्यांपासून तीनशे क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. दिवाळीपूर्वी त्यांनी त्यातील पन्नास क्विंटल कांदा मार्केटला विकला असता त्यांना आठ-नऊ रु पये किलो दराने भाव मिळाला. यानंतर कांद्याचे दर दरदिवशी कमी कमी होऊन कांदा हा मातीमोल भावात म्हणजे एक रु पया किलोने विकला जात आहे. कांदा चाळीतून गाडीत भरण्यासाठी तसेच वाहतूक खर्च सुमारे तीन हजार रु पये येत असल्याने मजुरांचे पैसे घरातून द्यावे लागत असल्याने जाधव यांनी आपल्या चाळीत साठवून ठेवलेला सुमारे दीडशे क्विंटल कांदा परिसरातील चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळ बांधवांच्या शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घालत आहे.-----------------------------सरकार हे कोणत्याही पक्षाचे असू द्या ते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे. मते घेईपर्यंत त्यांना शेतकरी दिसतो ज्याप्रमाणे कांद्याचे भाव वाढल्यानंतर शासन कांदा आयात करून गरज भागवतो त्याप्रमाणे भाव कमी झाल्यावर कांदा निर्यात केली जात नसल्याने बाजारभावात कांदा मातीमोल दरात विकावा लागत आहे, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतकºयांचा कांदा कमीत कमी पाच रु पये किलोने विकला जावा.- पोपट जाधव, शेतकरी, पाटोदा (25पाटोदाकांदा)
चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 5:17 PM
पाटोदा : दिवाळीपूर्वी आठ-नऊ रु पये किलो दराने विक्र ी होणारा उन्हाळ कांदा सध्या एक-दीड रु पये किलोपेक्षाही कमी भावात विकावा लागत असल्याने व वाहतुकीचा, मजुरीचा खर्चही खिशातून द्यावा लागत असल्याने येथील शेतकरी पोपट जाधव यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला आहे.
ठळक मुद्देकांदा निर्यात केली जात नसल्याने बाजारभावात कांदा मातीमोल दरात विकावा लागत आहे,