पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतात असलेले कांदा पीक पूर्णत: सडून गेल्याने तसेच मागील वर्षाचा कांदाही संपल्यामुळे कांद्यास सध्या पाच ते सहा हजार रु पयांचा बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे व दवबिंदूमुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.येवला तालुक्यात नगदी पिक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणता पोळ्यापासून या भागात कांदा लागवडीस प्रारंभ केला जातो.हा लागवड केलेला कांदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे सडून गेला आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च केला, पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकºयांना लाखो रु पयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. तसेच सध्या कांद्यास मिळत असलेल्या बाजारभावामुळे व पुढील काही दिवस असाच भाव मिळणार असल्याचा कयास बांधला जात असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शेतकरी मिळेल तेथून कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदा पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कांदापात पिवळी पडत असल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकºयांचा खर्च वाढू लागला आहे.
धुक्यामुळे कांदा उत्पादक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:07 AM
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून फवारणी : मर रोगाचा प्रादुर्भाव