नाशिक : केंद्र सरकारनेकांदा निर्यातबंदी करून सरकारची शेतकरीविरोधी भूमिका अधोरेखित केली आहे या निर्यातबंदीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी शनिवारी फेसबुक लाईव्ह, रविवारी व्हाट्सअप मेसेज, सोमवारी ट्विटर मोहीम,मंगळवारी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून केंद्राच्या विरोधात आंदोलन करणार आहेत .मागील वर्षी कांदा दरात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने 29 सप्टेंबर 2019 ला निर्यातबंदी केली होती ही निर्यात बंदी हटवत असताना केंद्र सरकारने प्रत्यक्ष घोषणा 26 मार्च 2020 ला केली त्याची अधिसूचना 2 मार्च 2020 ला काढली . मात्र निर्यात बंदिचा निर्णय एका रात्रित घेण्यात आला शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्ष 2022 पर्यंत दुप्पट करण्याची भाषा करणारे केंद्रातील मोदी सरकार कृतीतून मात्र पूर्णपणे शेतकरीविरोधी भूमिका घेत आहेराज्यात रस्ता रोको, वेगवेगळे आंदोलने व मोर्चे काढून केंद्र सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जात नसल्यानेशनिवारी 19 सप्टेंबर 2020 पासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे .सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे असे संघटनेचे भारतदिघोळे यांनी सांगितले .