लासलगाव/पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला हंगामातील सर्वाधिक २,६९१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत कांद्याला २६५० रुपयांचा भाव मिळाला. परंतु आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही तासांतच भाव पाचशे रुपयांनी घटल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. लासलगाव येथे काही काळ लिलाव बंद पडले होते.कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकºयांनी विक्रीला काढला आहे. त्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ही तात्पुरती घट पहायला मिळाली. दुपारपर्यंत ६०३ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले. त्यानंतर व्यापाºयांनी कमाल भाव १७५० रूपये पुकारण्यास सुरूवात केली. दरात ९५० रूपयांची घट झाल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडले. गुजरातमधील अतिवृष्टी आणि मध्य प्रदेशातील दीड लाख टन कांदा खराब हवामानामुळे सडल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील खरीप कांदा बाजारात येईपर्यंत किमान तीन महिने तरी भावात स्थिरता राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत २,६५५ रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. सरासरी भाव २००० ते २५०० रुपये असा राहिला. आवक वाढू लागल्यामुळे उपबाजार समितीने सटाणा रस्त्यालगत ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे यांच्या तीन एकर खुल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात कांदा मार्केट हलविले आहे. धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्'ातूनही आवक झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली. पुणे जिल्हातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १० किलोस ३०० रुपये भाव मिळाला. मागील वर्षीपेक्षा चौपट भाव मिळाला आहे. १५ हजार पिशवी आवक होऊनही बाजारभाव कडाडले आहेत.
कांदा उच्चांकी @ २६९१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:28 AM