येवला : येवला बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढत असून, गुरुवारी कांद्याचे निर्यातमूल्य कमी झाल्याने कांद्याचे भाव १०० रु पयांनी वाढले. सोमवारी मार्केटला सरासरी ११५० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाले. सोमवारी पुन्हा १०० रुपयाने कांद्याचे बाजारभाव वाढले. ६०० ट्रॅक्टरमधून १३ हजार क्विंटल कांदा येवला कांदा बाजार आवारात दाखल झाला. बाजारभाव केवळ ७०० रुपये ते १४२५ रुपये मिळाले, तर सरासरी ११५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांदा पीक एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्याने खर्च तर करून बसलो परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपटणे घेण्याची वेळ येते की काय, अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत.नोव्हेंबर महिन्यात प्रतिटन ४५० डॉलरवरून ७०० डॉलर केलेले किमान निर्यातमूल्य केंद्राने घटवल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव किमानपक्षी टिकण्याची अशा निर्माण झाली आहे.निर्यातमूल्य ७०० डॉलर प्रतिटन असताना नोंव्हेबरमध्ये, एक लाख १९ हजार टन कांद्याची निर्यात झाली. आता पुन्हा निर्यातमूल्य कमी केले तर मोठ्या प्रमाणावर निर्यात होईल आणि देशात कांद्याचे भाव वाढतील. ही भीती अनाठाई असल्याचे केंद्राच्या लक्षात आल्याने व कांदा उत्पादक शेतकऱ्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा एकत्रित परिणाम म्हणून केंद्राला निर्यातमूल्य कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. (वार्ताहर)
कांदा १०० रुपयांनी वाढला
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM