उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत लाल (रांगडा) कांद्याच्या आवकेबरोबरच बाजारात दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. सर्वोच्च भाव १६०० रुपये प्रतिक्विंटल होते तसेच गेल्या एक महिन्यापासून मका (भुसार) मालाची आवक स्थिर असून, भाव १२३७ पर्यंत स्थिरच आहेत.उमराणे बाजार समितीत गेल्या महिन्यांपासून कांद्याची प्रचंड आवक होत असल्याने बाजार भावात घसरण सुरूच होती. मागील सप्ताहात कांद्याचे बाजारभाव १३०० ते १४०० रूपयापर्यंतच होते; चालू सप्ताहात लाल कांद्यास देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्याने प्रचंड आवक असूनही दिडशे ते दोनशे रूपयांनी वाढ झाली आहे. तसेच सरासरी भावातही तेवढीच वाढ झाली आहे. दरम्यान, महिनाभर उशीरा येणारा लाल कांदा सद्यस्थितीच्या सततच्या ढगाळ व रोगट हवामानामुळे लवकर बाजारात विक्रीस येत असल्याने कांद्याची प्रतवारीही काही प्रमाणात घसरली आहे.
उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली
By admin | Published: January 30, 2015 12:15 AM