ठळक मुद्देलिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद
विंचूर : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारावरील शेतीमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असून, सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.