मनमाड : सन २००१६ ते २०१७ मधे वेळोवेळी खरेदी करून पाठवलेल्या कांद्याचे सव्वादोन कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करून फसवणूक करणाºया कोलकाता येथील व्यापाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.मनमाड येथील कांदा व्यापारी सचिनकुमार लुणावत यांची निर्यातदार फर्म असून, मनमाड बाजार समितीमधून कांदा खरेदी करून परप्रांतात पाठवतात. त्यांनी कोलकाता येथील व्यापारी पंकज अग्रवाल यांना सन २०१६ ते ८ नोहेंबर २०१७ पर्यंत कांदा खरेदी करून विक्रीसाठी पाठवला होता. दरम्यानच्या काळात अग्रवाल यांनी विश्वास संपादन करून माल खरेदी केला. लुणावत यांनी पैशांची मागणी केली असता आज पाठवतो, उद्या पाठवतो असे सांगून टाळाटाळ केली. अखेर ही रक्कम दोन कोटी २४ लाख १९ हजार ७३२ रुपयांवर पोहचून फसवणूक झाली असल्याचे लुणावत यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंकज अग्रवाल यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदा व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:22 PM
मनमाड : सन २००१६ ते २०१७ मधे वेळोवेळी खरेदी करून पाठवलेल्या कांद्याचे सव्वादोन कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करून फसवणूक करणाºया कोलकाता येथील व्यापाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
ठळक मुद्देव्यापाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन कोटी २४ लाख १९ हजार ७३२ रुपयांवर पोहचून फसवणूक