नाशिक : देशात सर्वाधिक आयकर संकलित करण्यात राज्याच्या आयकर विभागाने आघाडी घेतली असून, हैदराबादने प्रथम, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय करपात्र उत्पन्नवाढीसाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून १०५ कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली असून, त्यात नाशिकचा वाटा ५० कोटी रुपयांचा आहे. रोखीत व्यवहार करून कर चुकवणारे डॉक्टर्स, बिल्डर्स, कोचिंग क्लास व्यावसायिक आणि करचोरीसाठी शेतीचे उत्पन्न पुढे करणाºया बोगस शेतकºयांवर करडी नजर असल्याची माहिती आयकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी दिली. त्याचप्रमाणे कांदा व्यापाºयांवरही नजर असल्याचे त्यांनी सांगितले.आयकर विभागाच्या कार्यालयात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शुक्ल यांनी विविध योजनांची माहिती दिली.मुंबई आणि विदर्भ वगळून कार्यक्षेत्र असलेल्या आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त शुक्ला यांनी करपात्र उत्पन्न असतानाही कर भरण्यास टाळाटाळ करणाºयांना विवरणपत्रे तातडीने भरावी अन्यथा करावाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. नोटाबंदीनंतर बॅँकेत मर्यादेपेक्षा अधिक धन भरणाºया खातेदारांना आॅनलाइन विचारणा करण्यात आल्या आहेत. त्यांनी त्यावर पूर्तता करावी, असे आवाहनही केले. नाशिक जिल्ह्णातील कांदा व्यापाºयांवर गेल्या आठवड्यात छापे घालण्यात आले होते. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. कोणत्याही पूर्ततेसाठी कालावधी दिला जात असल्याने यातून काय निष्पन्न झाले ते लगेचच स्पष्ट होणार नाही मात्र, कांदा व्यापाºयांवर आयकरचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. शेती उत्पन्न करमुक्त असते. मात्र, शेतीमालाचा व्यापार करणाºयांना मात्र कर भरावा लागतो. त्यानुसार तो वसूल केला जात असल्याचेही शुल्क म्हणाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगला प्राप्तीकर वसूल झाला आहे. गेल्या वर्षी ४२ हजार २८८ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. यंदादेखील ४२ हजार २०० कोटी रुपयांपर्यंत वसूल झाला आहे. एकूण करात वाढ आणि निव्वळ करात वाढ यात फरक आहे एकूण कर संकलनात हैदराबादने प्रथम आणि महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला असला तरी महाराष्टÑात आयकर परताव्याचे काम अधिक असल्याने निव्वळ वाढ ही २२ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले. कर पात्र उत्पन्नाच्या शोधासाठी या विभागाने आत्तापर्यंत ४५ सर्व्हे केले असून, त्यात १०५ कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघड झाली आहे. नाशिक जिल्ह्णात यातील सुमारे दहा सर्व्हे करण्यात आले असून, त्यात ५० कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे, असेही ते म्हणाले.सध्या करपात्र असूनही अनेक जण आपल्या उत्पन्नानुसार कर भरणा करीत नाही. त्यामुळे अशांवर कारवाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी विवरण सादर करणे गरजेचे आहे. अनेक व्यावसायिक रोखीत व्यवहार करतात आणि ते रेकार्डवर आणत नाही अशा डॉक्टर्स, कोचिंग क्लासेसचालक आणि बिल्डर्स यांच्यावर करडी नजर आहे, असे सांगून ते म्हणाले की, अन्य उद्योग व्यवसाय असतानादेखील कर चुकवेगिरी करण्यासाठी शेती हा व्यवसाय दाखवतात अशा बनावट शेतकºयांवरही आयकर खात्याची नजर असल्याचे शुक्ला म्हणाले.सज्जनों का सहारा, दुर्जनोंको डर हो..सरकारने आयकरप्रणाली अत्यंत सुलभ केली आहे. करपात्र व्यक्तींनी रक्कम भरावी यासाठी अत्यंत सरल फॉर्म असून, आयकर कार्यालयातदेखील टॅक्स रिटर्न्स प्रिपीयर्स स्कीम अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे आयकर कार्यालयाच्या अख्त्यारित दर बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर आयकर अधिकारी नागरिकांना पूर्वनियोजित वेळे न ठरवता थेट भेटू शकतात. करदात्यांची संख्या वाढविण्यासाठी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, सनदी लेखापाल यांचे एक प्रतिनिधी आणि आयकर अधिकारी अशा सर्वांनी ठिकठिकाणी जागृती करावी, असे नियोजन करण्याचा प्रस्ताव आहे.मोठ्या खरेदीवर करडी नजरमोठ्या रकमांच्या ठेवी, मोठ्या रकमेचे व्यवहार, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारी खरेदी असे सुमारे दहा निकष असून, त्यावरही आयकर खाते नजर ठेवून आहेत. जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात जमीन खरेदीच्या व्यवहारांबाबत मुद्रांक खात्याकडून रिअल टाइम माहिती उपलब्ध होत असून, या व्यवहारांबाबतही आयकर विभाग माहिती घेत आहे. नोटाबंदीनंतर मर्यादेपेक्षा अधिक रक्कम भरणाºयांना आॅनलाइन विचारणा करण्यात आली असून, त्या माध्यमातूनही माहिती संकलित केली जात आहे. नोटाबंदीनंतरच्या सर्व प्रक्रिया गोपनीय असल्याने त्यासंदर्भात अधिक तपशील देता येत नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
कांदा व्यापारी आयकरच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:17 AM