नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्राकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे घसरलेले दर आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकरी वावरत असतानाही निर्यादबंदी उठण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची वाट पहावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच बदललेल्या वातावरणाचा फटकाही शेतकºयांना बसत असताना केंद्र सरकारने मात्र निर्यातबंदी उठविण्यासाठी १५ मार्चचा मुहूर्त काढलेला आहे.केंद्राने तातडीने निर्यातबंदी उठवावी, बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळी राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३ चांदवड चौफुली येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.
कांदाप्रश्नी राष्टÑवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 11:06 PM
नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्राकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे घसरलेले दर आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकरी वावरत असतानाही निर्यादबंदी उठण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची वाट पहावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ठळक मुद्देचांदवड चौफुली येथे रास्ता रोको करण्यात येणार