येवला/अंदरसूल : कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयास मनिआॅर्डर पाठवून लक्ष वेधले असतानाच गुरुवारी (दि.६) अंदरसूल येथील शेतकºयाच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याने सदर शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल येथील उपबाजार समिती आवारात बुधवारी (दि.५) ५ क्विंटल ४५ किलो कांदा विक्र ीसाठी नेला असता उपस्थित व्यापाºयांनी सुरूवातीला ५० रु पये क्विंटलची मर्यादा दिल्याने अखेर ५१ रु पये क्विंटलने त्यांचा कांदा लिलाव झाला. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणार कसे व घर प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न पडलेल्या चंद्रकांत देशमुख यांनी कांदा लिलावातून आलेली २१६ रुपयांची रक्कम थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून देत निषेध नोंदविला. दरम्यान अंदरसूल बाजार आवारात उन्हाळी कांद्याला सरासरी ३०० रुपये तर लाल कांद्याला सरासरी ७५० रुपये भाव मिळाला.सद्यस्थितीत तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने कांद्यातुन आलेल्या पैशातुन घेतलेले कर्ज फेडण्यास व घर प्रपंचास मदत झाली असती परंतु माझा कांदा चांगल्याप्रतीचा असून देखील ५१ रु पये प्रतिक्विंटल अशा कवडीमोल भावाने कांदा गेल्याने ती आशा देखील धुळीस मिळाली. शेतकरी आत्महत्या का करतो, त्याचे उत्तर आज मला मिळाले. या कारणांमुळे कांद्याच्या पैशातून मी मुख्यमंत्र्यांना मनीआर्डर केली आहे.सोबत- ०६ येवला ओनियन या नावाने आयएनटीपीएचला सेव्ह आहे.कांदा विक्र ी पावती
कांद्याला प्रतिकिलो ५१ पैसे भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:23 AM
येवला/अंदरसूल : कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयास मनिआॅर्डर पाठवून लक्ष वेधले असतानाच गुरुवारी (दि.६) अंदरसूल येथील शेतकºयाच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याने सदर शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली आहे.
ठळक मुद्दे शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली