लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात देशांतर्गत आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ३०० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांपर्यंत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.देशांतर्गत गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भावावर झाला आहे.येथील बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या सर्वसाधारण बाजारभावात तीनशे रुपयांनी घसरण झाली. शनिवारी १ हजार २६७ वाहनातून २२ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल १५५१ रुपये, किमान ५०० रुपये तर सर्वसाधारण १३०० रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला होता. लासलगाव बाजार समितीत येवला तालुक्यातील पाटोदा येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख बोराडे यांनी अंदाजे ७ क्विंटल लाल कांदा विक्रीला आणला होता. या कांद्याला सातशे अकरा रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.उत्पादन खर्चाचा विचार केले तर तेराशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलला येत असल्याने हा कांदा मी तोट्यात विक्री करीत असल्याचे बोराडे यांनी सांगत केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कांद्याला दोन हजार ते एकवीसशे रुपये हमी भाव द्यावा, जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यातीवर जोर दिला पाहिजे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करीत आहे.
देशांतर्गत आवक वाढल्याने कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 11:56 PM
लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात देशांतर्गत आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ३०० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांपर्यंत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ठळक मुद्देलासलगाव बाजार समिती : सर्वसाधारण भावात ३०० रुपयांनी घट