लासलगाव : गेल्या पाच दिवसात कांदा दरात ८०० रु पयांची घसरण झाली असुन आज सकाळी कांदा आवक कमीच होती. सकाळी शंभर रूपये दरात घसरण होत लासलगाव बाजारपेठेत २४५ वाहनातील कांद्याची किमान १२०१ ते कमाल ३१८१ व सरासरी २८५१ रूपये प्रतिक्विंटल भावाने विक्र ी झाला. सणासुदीच्या तोंडावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये घसरण सुरूच असल्याने बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे. ९ आॅक्टोंबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ३६०० रूपये प्रतिक्विंटल भाव होता मात्र आज सरासरी २८०० रु पये भाव मिळत असल्याने गेल्या पाच दिवसांमध्ये कांदा दरांमध्ये ८०० रूपयांनी घसरले आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज अडीच ते तीन लाख क्विंटल कांद्याची आवक होत असते मात्र हिच आवक आता कमालीची घटली आहे. संपूर्ण देशातून फक्त दोन ते अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. कांद्याचा पुरवठा इतका घसरला असतानाही कांद्याचे दर वाढण्याऐवजी घसरले आहे.
पाच दिवसात कांदा दरात ८०० रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:16 PM