वणी : दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्यात मुल्य व लेटर आॅफ क्र ेडीट अशा बाबी सरकारने नियमानूकुल केल्याने चोवीस तासातच कांदा दर घसरल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत तर व्यापारी वर्गानेही वेट अँड वॉचची भुमिका घेतल्याने खरेदी विक्र ी व्यवहार प्रणालीवर परिणाम झाला आहे. वणी उपबाजारात शुक्र वारीसहा हजार क्विंटल कांद्याची २१४ वाहनातुन आवक झाली ३१५० रु पये कमाल २७५० रु पये किमान तर २९२१ रु पये सरासरी प्रति क्विंटलला दर मिळाला.शनिवारी उपबाजारात २५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. ३१०२ रु पये कमाल २५०० रु पये किमान व २८७० रु पये सरासरी असा दर प्रतिक्विंटलचा कांद्याला मिळाला.या दोन दिवसातील व्यवहाराचा फरक बघितला तर दर घसरल्याचे दिसुन येते. कांद्याचे दर वाढल्याची ओरड सुरु झाली की दर नियंत्रणासाठी नियमानुकुल धोरण राबविण्यात येतात. निर्यातीसाठी ८५० हॉलर प्रति मेट्रीक टन व लेटर आॅफ क्र ेडिट अशा अटी लागु केल्याची माहीती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. लेटर आॅफ क्र ेडिट या नियमानुसार परदेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्याची रक्कम खरेदीदाराच्या बँकेतुन रक्कम देण्याबाबतचे त्या देशातील बँकेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कांदा निर्यातीसाठी बंदरावर पाठविण्यात येतो. खरेदी-विक्र ी व्यवहार प्रणालीचे नियम पुर्तीनंतर हा कांदा परदेशात पाठविण्यात येतो अशी माहीती बोरा यांनी दिली. या अटींची पुर्तता करणे व्यापारी वर्गाच्या आवाक्याबाहेर असल्याने खरेदी विक्र ी व्यवहाराची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान कांदा आयात करण्याच्या कार्य प्रणालीला सध्या अग्रक्र म दिला जातो आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम सत्रापर्यंत आयात निविदा खुल्या असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान पाकिस्तान व इजिप्त या परदेशातुन कांदा आयात करण्यासाठी सुरु आसलेली प्रणाली दर नियंत्रणासाठी असल्याची भावना उत्पादकांची आहे. तसेच या दोन नमुद देशांमधुन कांदा खरेदी करण्यासाठी इतर देशही स्वारस्य दाखवतील. कारण निर्यात मुल्यामुळे भारताच्या कांद्यापेक्षा या दोन देशातील कांदा स्वस्त पडेल असे व्यावसायिक गणित असल्याचा आडाखा व्यापारी वर्गाचा असल्याने वेट अँड वॉचची भुमिका त्यांनी घेतली आहे. देशांतर्गत गुजरात, राजस्थान व दाक्षिण्यात्य राज्यांमाधे कांद्याला मागणी वाढलेली आहे. भारतीय कांदा त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याच्या कांद्याचा नावलौकीक जागतिक पातळीवर टिकुन आहे. सध्या दररोज पावसाची हजेरी सुरु आहे, त्यात अशा पावसाळी वातावरणात कांदा चाळीतुन कांदा टॅक्टरमध्ये भरून बाजार समित्यांमधे तसेच उपबाजारात आणणे हे आव्हानात्मक असताना उत्पादकांना चार पैसे मिळण्याची अनुकुल स्थिती असताना धोरणात्मक निर्णयातील बदल ही बाब व्यवहार प्रणालीच्या गतिमानतेवर परिणाम करणार असल्याची भावना उत्पादकांची झाली आहे.
निर्यात मूल्य वाढताच कांदा भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:48 PM