लासलगाव येथे मागीलसप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,००,६९४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ९५० कमाल रु पये २,२८७ तर सर्वसाधारण रु पये२,०२७ प्रती क्विंटल राहीले.केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८टक्के , तर उत्पादनात २०टक्के वाढीचे अनुमान आहे.फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादनामुळे बाजारभाव मातीमोल होण्याची शकयताअसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी हटविण्याची आग्रही मागणी राज्यातील शेतकº्यांकडून होत आहे.देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय फलोत्पादन विभागाने वर्तविला आहे.या पाशर््वभूमीवर, वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरिप आणिलेट खरीप मिळून ५५ लाख टन तर, रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे.साधारपणे मार्च ते आॅक्टोबर मिहन्यात देशात रब्बी कांद्याचा पुरवठा असतो. मार्च महिन्यात लेट खरीप (रांगडा) आणि रब्बी (उन्हाळ) एकाचवेळी काढणी व व विक्र ीला येऊन महाराष्ट्रासह देशभरातील बाजार समित्यांत मालाची आवक वाढण्याची शक्यता व्यक्तकेलीजातआहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अनुक्र मे खरीप आणिरेट खरीप कांदा बाजारात असतो. खरीप कांद्यात टिकवण क्षमता नसते. त्याची विक्र ी करावी लागते. रब्बी कांदा टिकवण क्षमता असते. पारंपरिक कांदा चाळीत सहा ते आठ महिने रब्बी कांदा साठवता येतो. यावर्षी उत्पादनवाढीची मोठी समस्या ही रब्बी कांद्यात निर्माण होणार आहे.आता लेट खरीप कांद्याची आवक होत आहे. यंदा लेट खरीपाचे (रांगडा) उत्पादन कमी असल्याने सध्याचे बाजारभाव फेब्रुवारी २०१९ तुलनेत चढे आहेत. लेट खरीपाचा कांदा मार्चच्या मध्यापर्यंत बाजारात सुरू असतो. कांदा बाजारभावात सध्या उतरता कल असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने पुरवठा वाढण्याची परिस्थिती दिसतेय. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातबंदी सारखे निर्बंध पुरवठावाढीची समस्या आणखीतीव्र करण्यासाठी कारणीभूत ठरतील, असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे.