लासलगाव : कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची परिस्थिती, कांदापुरवठा अधिक, तर मागणीत घट या कारणामुळे कांद्याचे भाव १३०० रुपयांपर्यंत आले असून सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, परराज्यांतील कांदा आता बाजारात यायला सुरुवात व मागणीत घट होत असल्यामुळे दि. १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्म्यावर आले आहेत.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता या राज्यांत कांदा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली. परिणामी, भाव कोसळले आहेत. त्यातही मध्यंतरी भाव वाढल्यामुळे शेतकरी कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केल्याने हॉटेलमध्ये गर्दी कमी झाल्याने कांद्याच्या मागणीत घट झाली आहे.वर्षभरापूर्वी कांद्याने किलोला शंभरी पार केली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी चढ्या भावाने बियाणे व कांदा रोपे विकत घेऊन लागवड केली. कांदा लागवड क्षेत्र वाढले. त्यातच ४० ते ५० रुपये किलोवर असणारे भाव घाऊक बाजारात १२ ते १५ रुपयांवर आल्यावर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याने कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढले आहे.येथील मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याला कमीतकमी ५०० रुपये, सरासरी १३५१, तर जास्तीतजास्त १४३० तर उन्हाळी कांद्याला कमीतकमी ९०० रुपये, सरासरी १२५०, तर जास्तीतजास्त १३७२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.लाल कांदा कमाल भाव आलेख (प्रति क्विंटल)१ मार्च - २८५३२ मार्च - २७४१४ मार्च - २४४५५ मार्च - २११२६ मार्च - २०५२८ मार्च - १७६१९ मार्च - १४३०१० मार्च - १२५०कांदा भावाची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे आता नाफेडने कांदा स्थिरीकरण निधीतून कांदा खरेदी सुरू केली पाहिजे. त्याचा परिणाम बाजारपेठेत भाव वाढण्यासाठी होणार आहे. हॉटेल व्यवसायावर तसेच विवाहात सामील लोकांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांच्या भावावर झाला आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती, लासलगाव
नऊ दिवसांत कांदा भाव निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:31 PM
लासलगाव : कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची परिस्थिती, कांदापुरवठा अधिक, तर मागणीत घट या कारणामुळे कांद्याचे भाव १३०० रुपयांपर्यंत आले असून सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, परराज्यांतील कांदा आता बाजारात यायला सुरुवात व मागणीत घट होत असल्यामुळे दि. १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्म्यावर आले आहेत.
ठळक मुद्देमहाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली.