लासलगाव : बुधवारी दुपारी अचानक इतर राज्यांत कांद्याची मागणी वाढली आणि मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ३२९ रुपयांची वाढ होऊन कांद्याला १९०० रुपये हा चालू हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला.मंगळवारी लासलगाव येथे ३१७७५ क्विंटल कांद्याचा लिलाव ५०० ते सर्वाधिक १४५९, तर सरासरी १३४० रुपये प्रतिक्विंटल दराने झाला होता. बुधवारी सकाळी सत्रात किंमत तेजीत नव्हती. परंतु दुपारनंतर तेजी झाली आणी किमान भाव ५०० कमाल भावात ३२९ रुपयांची तेजी होऊन १८७५ रूपये तर सरासरी भावात २९० रूपयांची तेजी होऊन १६५० रूपये हा भावा मिळाला तसेच दिवसभरात १३७५ वाहनांतील कांद्याचे लिलाव पूर्ण झाले. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १,१३,७०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव रु पये ३०० ते १५०२ सरासरी रु पये १०७६ प्रतिक्विंटल राहिले.अन्य राज्यांत कांद्याची मागणी वाढल्याने तसेच मध्य प्रदेश सरकारने ८०० रूपये दराने कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावल्याने लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मागील आठवड्यात तेजी सुरू झाली. ती या सप्ताहात टिकून आहे.पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे.तर मध्य प्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रूपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.त्यामुळे मध्य प्रदेशातील या कालावधीमध्ये इतर राज्यांत जाणारा कांदा रवाना झाला नाही.त्यामुळे पंजाब ,हरयाणा व राज्यस्थान , दिल्ली या भागात इतर राज्यांत कांदा जात नसल्यानेच महाराष्ट्रातील व त्यातही जिल्ह्यातील लासलगाव कांदा बाजारपेठेत येणाºया कांद्याची सर्व महत्वाचे बाजारपेठेत विक्र ी करणाºया व्यापारी यांची विशेष मागणी वाढली आहे. कांदा भाव तेजी दिसत असली तरी गेल्या पाच महीन्यांपासुन साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्री साठी आणीत आहे. पाच सहा महीन्यापासुन साठवलेले कांद्याचे वजन कमी होते .तसेच खराब होणाºया कांद्याला चाळी बाहेर फेकले जाते. त्यामुळे कांदा भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होत आहे.शेतकरी वर्गात आनंदयेवला : येथील बाजार समितीअंतर्गत येणाºया अंदरसूल बाजारात कांद्याला बुधवारी विक्रमी दोन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. तसेच येवल्यात १९०० रुपये भाव मिळाल्याने शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे. येवला व अंदरसूल मार्केटच्या ६० वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच कांद्याची प्रचंड आवक होत भावात देखील तेजी आली. बुधवार (दि.२) रोजी १८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यंदा जुलै व आॅगस्ट महिन्यात कांद्याला ‘अच्छे दिन’ आले आहे. दोन हजार रूपये प्रती क्विंटल भाव मिळू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर चाळीत साठावलेला कांदा बाहेर काढू लागला आहे. सध्या येवला कांदाबाजार आवार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत चालत आहे. दि. १० जुलै रोजी मध्यप्रदेश शासनाने हमी भावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात राजस्थान, गुजरात, आसाम राज्यात पुरामुळे कांदा नष्ट झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली. आॅगस्टच्या मध्यापर्यंत कांद्याला किमान तीन ते साडेतीन हजार रु पये प्रतीक्विंटल भाव येण्याची शक्यता व्यक्त व्यक्त केली जात आहे.सध्या निर्यातीपेक्षाही देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी असून बाजार भाव वाढतच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तीन ते साडेतीन हजार रूपये प्रती क्विंटल पर्यंत कांद्याला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. - भरत समदडीया, कांदा व्यापारी, येवला
परराज्यात मागणी वाढल्याने कांदा तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 11:53 PM