ठळक मुद्दे२७० रुपयांवरुन ३४१२ हा सर्वाधिक भाव जाहीर
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. १६) शुक्र वारच्या तुलनेत २७० रूपयांची तेजी होऊन ३४१२ रूपये हे सर्वाधिक कांदा भाव जाहीर झाले.शुक्र वारी (दि.१३) लासलगाव येथे १३८०० क्विंटल कांद्याची ९५१ ते ३१४२ रूपये व सरासरी भाव २८५१ रूपये होता. सोमवारी सकाळी सुरवातीस कांदा भावाची पातळी शुक्र वार इतकीच होती. परंतु दुपारी अचानक कांदा भावाने ऊसळी घेत कमाल कांदा भावात २७० रूपयांची तेजी होऊन ३४१२ रूपये जाहिर झाला. तर किमान भाव सरासरी भावात ३५० रूपयांची वाढ झाली व आज चार वाजेपर्यंत ११०२ वाहनातील कांद्याची विक्र ी झाली.