शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कांदा भाव खाणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 5:58 PM

येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. शिवाय येवला कृषी उत्पन्न बाजार आवारात शनिवारी कांद्याला १४७० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासादायक चित्र : मागणी अन पुरवठ्याचे गणित समजून घेण्याची आवश्यकता

येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. शिवाय येवला कृषी उत्पन्न बाजार आवारात शनिवारी कांद्याला १४७० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.वर्षभरापासून कांद्याला एक हजार रु पयांचा टप्पा गाठण्यासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. काही वर्षांचा अनुभव पाहता उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो. पण गेल्यावर्षी राज्यात विक्र मी कांद्याचे उत्पादन झाले होते. त्यामुळे भाव कोसळले होते. तेव्हापासून कांद्याची घाऊक बाजारपेठ अनिश्चिचततेच्या भोवºयात अडकली होती. मागील हंगामात कांद्याला जेमतेम दर मिळत होता. यावर्षी उन्हाळी कांद्याची आवक साधारपणे मे पासून सुरू झाली. यासाठी प्रति क्विंटलचे भाव पाचशे ते साडेपाचशे रु पये होता. राज्यापाठोपाठ मध्यप्रदेशात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी दर कोसळल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून इतर राज्यात उन्हाळ कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे मध्यप्रदेशातील कांदा लवकर संपला. आता केवळ महाराष्ट्रातील शेतकºयांकडे कांदा शिल्लक आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कांदा भाव खाणार आणि शेतकºयाला दोन पैसे मिळणार असल्याची स्थिती निर्माण होण्याची अशा आहे.कांद्याला मे आणि जून महिन्यात मागणी असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी कमी होते. तसेच पावसाळी हवामानाचा त्या कांद्यावर परिणाम होऊ नये, यासाठी शेतकरी चाळीत कांदा ठेवतात. यंदा मध्यप्रदेशातही कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून देशातील इतर राज्यांत कांद्याची मागणी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. ६ आॅक्टोबर २०१८ पर्यंत कांद्याला ६०० रु पये प्रतीक्विंटल चा भाव मिळत होता. मात्र या आठवड्यापासून कांदादर वाढत असल्याचे चित्र आहे. कांद्याने १४७० रु पयाचा टप्पा गाठल्याने आता टप्याटप्याने मर्यादित तेजी येईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.अनियमित व अत्यल्प पावसामुळे महाराष्ट्रात खरिपाची लागवड कमी झाली आहे. उन्हाळ कांदा संपल्यावर लाल कांद्याला चांगला भाव मिळू शकतो, त्यानुसार शेतकºयांनी मागणी अन पुरवठ्याचे गणित समजून घेण्याची आवश्यकता आहे.चीनमध्ये पाऊस झाला आहे. तसेच कर्नाटकमधील बंगळुरु रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाºया कांद्याच्याही काढणीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा येत्या काळात भाव खाणार आहे. तसेच दुसरीकडे ऐन पावसाळयात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पोळ (खरीप) कांद्याची लागवड रखडली आहे.श्रावणातील किमान पावसावर उभारी मिळालेल्या शेतकºयांना कांदा लागवड केली आहे. उन्हाळ कांदा नोव्हेंबरपर्यंत संपत येईल, अशा काळात पोळ कांदा बाजारात येण्यास सुरु वात होईल. आणि पर्यायाने या कांद्याखेरीज ग्राहकांकडे दुसºया कांद्याचा पर्याय राहणार नाही. गेल्या सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यात व पाकिस्तानची सीमा कांदा निर्यातीसाठी बंद असली तरी अन्यत्र परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापुर याठिकाणी मागणी चांगली आहे.नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. इतर राज्यांतून मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या ८ दिवसापासून कांदादरात दररोज सुधारणा होत आहे. ही शेतकºयांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.नंदूशेठ अट्टलकांदा व्यापारी,येवला.