लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला.कांदा दर नियंत्रणासाठीचे धोरण व अस्वस्थतेचे वातावरण कांदा उत्पादक आणि व्यापारीवर्गात आहे. सध्या होणारे चढ-उतार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे; परंतु गुरुवारी मिळालेल्या दराने कांदा खरेदी - विक्रीस वेग आला होता. पावसाने आता जर विश्रांती घेतली तर पुढील हंगामही उत्तम राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.आता दिवाळी कशी जाणार?लासलगाव : आता दिवाळीनंतरच कांदा निर्यातबंदी उठविण्याचा फेरविचार सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कांदा दराची पातळी वाढण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे सरकारी निर्णयाने आता कमी दराने कांदा उत्पादकांच्या घरात दिवाळीला आनंदाला ओहोटी येईल, अशी शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली आहे. काही महिने चाळीत साठविलेला कांदा कमी भावात विक्र ी होईल या चर्चेने कांदा उत्पादक नाराज झाले आहेत. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत गुरुवारी बुधवारच्या तुलनेत कमाल भावात ७५, तर सरासरी भावात १५१ रुपयांची घसरण झाली. कांदा आवक केवळ ४१० वाहनांची झाली असून, बाजारभाव रु पये प्रतिक्विंटल किमान १२०१ ते कमाल ३८२५ आणि सरासरी ३४०० रुपये होते.
वणी येथे कांद्याला ३६९९ रुपयांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:48 PM
वणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला.
ठळक मुद्दे प्रतिक्विंटल किमान १२०१ ते कमाल ३८२५ आणि सरासरी ३४०० रुपये होते.