वणी (नाशिक) : येथील बाजार समितीत मंगळवारी कांद्याला विक्रमी ६३८० रूपये भाव मिळाला. कांद्याला वाढत असलेल्या सातत्याच्या मागणीमुळे आवकेत घट झाली आहे तर दिवसेंदिवस चढ्या दराने खरेदी विक्रीचे व्यवहारप्रणालीस गतीमानता आली आहे. मंगळवारी उपबाजारात नऊ वाहंनामधुन १८० क्विंटल कांदा आवक झाली. ६३८० कमाल, ५९०३ किमान तर ६१८० रु पये सरासरी अशा दराने व्यापारी वर्गाने कांदा खरेदी केला. देशांतर्गत वाढलेली मागणी व परप्रांतीय व्यापाऱ्यांचा स्थानिक व्यापाऱ्यांकडे कांदा खरेदीसाठीचा पाठपुरावा यामुळे तेजीचे वातावरण कायम असुन नियोजनबद्ध पद्धतीने कांदा विक्र ी करणारे उत्पादक यांना बाजारातील चढउताराच्या व्यवहार प्रणालीच्या माहितीतून ज्ञान असुन र्इंटरनेटच्या माध्यमातुन देशभरातील कांदा दराची घाऊक तसेच किरकोळ माहिती प्राप्त होत असल्याने कांदा उत्पादक हुशारीने कांदा विक्र ी करत आहे. व्यावसायिक कौशल्याचा वापर ते कांदा विक्र ी व्यवहारात करत असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
वणीत कांद्याला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 2:18 PM