आकाश गायखेचांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.मागीलवर्षी निर्माण झालेली पाणीटंचाई, तसेच दरवर्षी पिकांवर फवारणीसाठी वापरलेली औषधे, कीटकनाशके यामुळे गोदाकाठ व निफाड तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे.गत सहा महिन्यांपासून कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने चांदोरी, सायखेडा, चाटोरी, करंजगाव, खेरवाडी, सुकेणे, कोठुरे, पिंपळस, चितेगाव, दारणासांगवी, लालपाडी, बेरवाडी, निफाड, मांजरगाव, रवळस तसेच निफाड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांनी रब्बी हंगामात कांदा बीजची लागवड केली. सध्या पीक चांगले बहरले आहे, मात्र त्यांचे परागीकरण करणाºया मधमाश्या नसल्याने कांदा बीज उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण अधिक होते तेव्हा मोहोळ काढून मध विक्र ी करणाºयांची संख्या अधिक होती, पण गेल्या दोन वर्षांपासून मधमाश्यांचे मोहोळ दिसत नाही. त्यामुळे गावरान मध मिळत नाही. हे मध अनेक आजारांवर गुणकारी आहे.मधमाश्या कमी होण्याची कारणेमागील वर्षी असलेली पाणीटंचाई तसेच पिकांवर फवारली जाणारी विविध औषधे, तणनाशके यामुळे दिवसेंदिवस मधमाश्या कमी होत आहेत. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाश्या दिसत नाही. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.आपल्या भागातील मधमाश्या कमी झाल्यामुळे अनेक पिकांचे परागीकरण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- कैलास हांडगे, कांदा उत्पादक शेतकरी, चाटोरी.
कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 5:59 PM
चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
ठळक मुद्देपरिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.