पिंपळगाव बसवंत : कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता कमी केली आहे. त्यामुळे व्यापारी व शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही जाचक अट शिथिल करून साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ व सहकार व पणनमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शासनाने किरकोळ व्यापाºयांना पाच टन, तर होलसेल व्यापाºयांना पंचवीस टन कांदा साठवणूक क्षमता ठरवून दिली आहे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना खरेदी करता येत नाही. १९ डिसेंबर रोजी पिंपळगाव बाजार समिती आवारात कांद्याला दोन हजार ते कमाल आठ हजार चारशे सव्वीस रूपये व सरासरी सहा हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला व नऊ हजार पंधरा क्विंटल कांद्याची आवक झाली.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत त्याच दिवशी क्विंटलला किमान दोन हजार कमाल नऊ हजार सहाशे बावन्न रुपये, तर सरासरी सात हजार रुपये दर मिळाला. दहा हजार पाचशे बेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातही व्यापाºयांना कांदा ग्रेडिंग व पॅकिंगसाठी दोन-तीन दिवस लागतात. परंतु सहकार आणि पणन विभागाच्या कांदा साठवणूक क्षमतेच्या निर्बंधामुळे इच्छा असूनही व्यापारी कांदा खरेदी करू शकले नाही. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.लवकरच कारवाई करण्याचे आश्वासनशासकीय अटींमुळे पिकवता आले, पण विकता आले नाही अशी परिस्थिती बळीराजापुढे निर्माण झाल्याचेही बनकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. साठवणूक क्षमता वाढून देण्याबाबत छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी सचिवांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
कांदा साठवणूक क्षमता वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:02 AM
कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता कमी केली आहे. त्यामुळे व्यापारी व शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही जाचक अट शिथिल करून साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ व सहकार व पणनमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देपिंपळगाव : दिलीप बनकर यांचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना साकडे