अभोणा : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर एकदम निम्यावर आल्याने जिवापाड मेहनत घेऊन, चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवणूक करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. बाजारात नव्या लाल कांद्याची आवक वाढत असल्याने उन्हाळ कांद्याच्या दराविषयीच्या आशा धूसर झाल्या आहेत.एक ते दीड महिन्यापासून कांद्याच्या दरात चढउतार सुरू आहे. पाच ते आठ हजार रुपयांवर गेलेले दर दिवाळीनंतर कमी होऊ लागले. पावसामुळे लाल कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला. याचा लाभ उन्हाळ कांद्याला होण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घालून परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे गेल्यावर्षीसारखे दर क्विंटलला १० हजारांपर्यंत गेले नाही. त्यातच आता जिल्हाभरातील बाजार समित्या तसेच उपबाजारामध्ये लाल कांद्याची आवक मोठ्यश प्रमाणावर होऊ लागली आहे. दरम्यान, गत सप्ताहात येथील उपबाजार आवारात अंदाजे १७ हजार क्विटंल उन्हाळ कांदा विक्रीसाठी आला होता. पहिल्या दिवशी कमाल ३ हजार ९५ रुपये, तर २ हजार २०० रुपये दर मिळाला, नंतर मात्र दरात जवळपास ११०० रुपयांची घसरण होत सोमवारी (दि.८) कमाल २ हजार, तर किमान १ हजार ४०० रुपये दर राहिले.
अभोणा उपबाजारात कांदा गडगडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 11:50 PM
अभोणा : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर एकदम निम्यावर आल्याने जिवापाड मेहनत घेऊन, चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवणूक करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. बाजारात नव्या लाल कांद्याची आवक वाढत असल्याने उन्हाळ कांद्याच्या दराविषयीच्या आशा धूसर झाल्या आहेत.
ठळक मुद्देपावसामुळे लाल कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला.