याबाबत कांदा व्यापारी हरिश्चंद्र गुलाब सोनवणे (रा.चौगाव रोड, सटाणा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिश्चंद्र सोनवणे व दीपक सोनवणे हे दोघे गेल्या आठ वर्षांपासून डी.आर.ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावर रावळगाव फाट्याजवळ त्यांचे दुकान आहे. दिवसभर त्यांनी दुकानात शेतकऱ्यांकडून कांदे खरेदी करून त्यांना पेमेंट केले. सायंकाळी साडेसात वाजता कार्यालय बंद करताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले १ लाख ९५ हजार ७११ रुपये दुकानातील टेबलाच्या ड्राॅवरमध्ये ठेवले व दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता दुकानावर जाताच सोनवणे यांना दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमधील टेबल व त्यातील वस्तू इतरस्त फेकलेल्या आढळून आल्या. ड्राॅवरमधील १ लाख ९५ हजार ७११ रुपये तसेच दुकानातील दहा हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा २१ इंची एलईडी टीव्ही आणि नऊ हजार रुपये किमतीचे पैसे मोजण्याचे मशीनही गायब असल्याचे दिसून आले. यावेळी सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली असून त्यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, वर्षा पवार व पोलीस नाईक अतुल आहेर पुढील तपास करीत आहेत. (२६ सटाणा १)
-----------------
सटाणा येथील कांदा व्यापारी दिपक सोनवणे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी फोडलेले कपाट, टेबलाचे फोडलेले ड्रावर आणि इतरस्त फेकलेल्या वस्तु. (२६ सटाणा १)
===Photopath===
260521\26nsk_33_26052021_13.jpg
===Caption===
२६ सटाणा १