शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कांदेंच्या नाराजीनाट्याने शिंदे गटातील धुसफुस चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 12:22 AM

मिलिंद कुलकर्णी मतदारसंघातील विकासकामांविषयी दुजाभाव केला जात असल्याची भूमिका घेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आवाज उठविल्याने राज्यभर लोकप्रियता मिळविणाऱ्या नांदगावच्या आमदार सुहास कांदे यांनी स्वपक्षीय पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. चार महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुहास कांदे पहिल्या दिवसापासून होते. नाशिक जिल्ह्यात सेनेचे दोन आमदार आणि एक खासदार असताना सगळेच शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे गट प्रबळ होईल, असे वाटू लागले. शिंदे गटाने पदाधिकारी नियुक्ती, कार्यालयाचे उद्घाटन, तिन्ही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामांना मंजुरी असे टप्प्याटप्प्याने गती पकडलेली असताना कांदे यांच्या नाराजीनाट्याने ह्यआलबेलह्ण नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांदे यांचा रोख प्रामुख्याने दादा भुसे यांच्याकडे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कसे लक्ष घालतात, हे बघायला हवे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीनंतर आता स्वपक्षीय पालकमंत्र्यांशी संघर्षाची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षआधी कांदे भांडायचे, आता खोसकरभुसेंचे बेरजेचे राजकारण, रशीदभाईंचा तीळपापडफडणवीसांकडे पुन्हा पालकत्वराऊतांच्या सुटकेने सेनेला बळ

मिलिंद कुलकर्णीमतदारसंघातील विकासकामांविषयी दुजाभाव केला जात असल्याची भूमिका घेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आवाज उठविल्याने राज्यभर लोकप्रियता मिळविणाऱ्या नांदगावच्या आमदार सुहास कांदे यांनी स्वपक्षीय पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. चार महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुहास कांदे पहिल्या दिवसापासून होते. नाशिक जिल्ह्यात सेनेचे दोन आमदार आणि एक खासदार असताना सगळेच शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे गट प्रबळ होईल, असे वाटू लागले. शिंदे गटाने पदाधिकारी नियुक्ती, कार्यालयाचे उद्घाटन, तिन्ही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामांना मंजुरी असे टप्प्याटप्प्याने गती पकडलेली असताना कांदे यांच्या नाराजीनाट्याने ह्यआलबेलह्ण नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांदे यांचा रोख प्रामुख्याने दादा भुसे यांच्याकडे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कसे लक्ष घालतात, हे बघायला हवे.आधी कांदे भांडायचे, आता खोसकरराजकारणाचे रंग कसे बदलत असतात, हे नाशिककर अनुभवत आहेत. आघाडीतील दुसऱ्या पक्षाच्या पालकमंत्र्यांविरोधात संघर्षाची तलवार उपसणारे सुहास कांदे आता स्वपक्षीय पालकमंत्र्यावरही नाराज असल्याचे त्यांनीच जाहीरपणे सांगितले. त्यामुळे हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाविरोधात केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचा समज जनतेमध्ये पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे केवळ दादा भुसेच नव्हे तर सर्वच मंत्र्यांनी केवळ आढावा बैठका घेऊन सरकारचे कामकाज सुरू आहे, असे दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे कसे होतील, लालफितीचा अडथळा कसा येणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सत्तांतर राजकीय पक्षांनी केले; पण जनतेला बदल तर दिसला पाहिजे. कांदे यांनी मतदारसंघ विकासासाठी थेट न्यायालयात धाव घेतली तर खोसकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. ही वेळ का येते, याचा विचार मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला हवा.भुसेंचे बेरजेचे राजकारण, रशीदभाईंचा तीळपापडपालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या राजकारणावर चांगलीच पकड मिळवलेली आहे. महापालिकेत त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या ताहेरा शेख, रशीद शेख यांच्याशी जुळवून घेत सेनेला उपमहापौरपद मिळवले. त्या माध्यमातून स्वत:च्या मतदारसंघात कामेदेखील केली. शेख यांनी कॉंग्रेस सोडून हातावर घड्याळ बांधताच भुसे यांनी एमआयएमच्या आमदार मौलाना मुफ्ती यांना आपल्याकडे वळवले. दादांचा स्वभाव व कार्यशैली अशी की, आमदार मुफ्ती यांनी चक्क शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. भुसे यांनी राज्य सरकारकडून निधी आणून पूर्व आणि मध्य या दोन्ही मतदारसंघांत मोठी विकासकामे मंजूर केली. याची माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेला आमदार मुफ्तीदेखील उपस्थित होते. या नव्या समीकरणामुळे रशीद शेख यांचा तीळपापड झाला. त्यांनी त्याचदिवशी पत्रकार परिषद घेऊन श्रेयवादाचे नाट्य रंगवले. भुसे यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल, समाजवादी पार्टी यांच्यात खळबळ माजली आहे, हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.फडणवीसांकडे पुन्हा पालकत्वनाशिकमधील भाजपची मंडळी पुरती संभ्रमात आहेत. राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले, याचा आनंद साजरा करत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने निराशा पसरली. नैराश्याची ही लाट चार महिन्यानंतरही कायम आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. जिल्ह्यात पाच आमदार असताना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. दोन आमदार असलेल्या शिंदे गटाच्या दादा भुसेंच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली. आता या स्थितीत महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व पालिका जिंकायच्या कशा? एकच आशा म्हणजे पाच वर्षांपूर्वी नाशिकचे पालकत्व स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काहीतरी जिल्ह्याच्या पदरात पडावे, असे वाटते. डबल इंजिनचे सरकार आले असताना रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी, अशी अपेक्षा असताना वेगळेच घडत आहे. विमानसेवा तोकडी झाली, नाशिक - पुणे रेल्वे मार्गाविषयी फेरसर्वेक्षणाचा आदेश झाला. काही तासांसाठी नाशकात आलेल्या फडणवीस यांच्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी कैफियत मांडली. बघूया काही होते का?राऊतांच्या सुटकेने सेनेला बळपत्राचाळप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्याने नाशिकमधील सैनिकांना सर्वाधिक आनंद झाला. बहुसंख्य पदाधिकारी हे त्याचदिवशी मुंबईत पोहोचले आणि त्यांनी राऊत यांच्या आनंदयात्रेत सहभाग घेतला. राऊत आणि नाशिकच्या सैनिकांचे ऋणानुबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांच्याशी शिवसैनिकांचे भावनिक नाते निर्माण झाले. उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते असल्याने निवडणुकांची तयारी, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यात राऊत यांनी वर्ष-दीड वर्षापासून लक्ष घातले. राऊत कारागृहात गेल्याने शिवसैनिकांची अडचण झाली. आता राऊतसाहेब, राज्यात पहिला दौरा नाशिकलाच करणार असल्याचे दावे पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा असेच म्हणू लागल्याने राऊत नेमके येणार कुठे, हा प्रश्न आहेच. मात्र, शिंदे गटाच्या झंझावातातही ठाकरे गट अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस