नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे नियोजन सुरू झाले असून, एप्रिल महिन्यात माध्यमिक शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण्यात येणार आहे, तर एप्रिलच्या अखरेच्या आठवड्यात शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील व देवळाली कटक मंडळ क्षेत्रातील अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी वर्षाप्रमाणे यंदाही अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी पहिली सहविचार सभा एप्रिल २०१८ मध्ये होणार आहे. शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१८ व २०१९ या वर्षाकरिता आकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया (आॅनलाइन) पद्धतीने होणार आहे. नाशिक शहरातील महापालिका क्षेत्र तसेच देवळाली कटक मंडळ क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे कला, वाणिज्य, विज्ञान, एच.एस.-सी. व्होक (राज्य मंडळ संलग्न) वर्गाची प्रवेशप्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने आहे. या प्रवेशप्रक्रि येची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळास्तरावर सहविचार सभाही घेतली जाणार आहे. या सभेत प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती, वेळापत्रक याविषयी मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
एप्रिलपासून अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:26 AM