सभेच्या सुरुवातीस मागील सभेचे सभावृत्त कायम करण्यात आले. यावेळी आर्थिक वार्षिक अहवाल वाचन बाजारसमिती कार्यक्षेत्राची व केलेल्या सोईसुविधा विषयाचे वाचन करण्यात येऊन सदस्यांनी मंजुरी दिली.
बाजारसमितीच्या उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती आणि पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड येथे संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात आली. शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती बाजारभाव ॲप विकसित केले असून, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करत, ॲपच्या माध्यमातून शेतकरी थेट संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधू शकतो, असे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.
सभेस उपस्थित शेतकरी किसन बोराडे यांनी शेतकऱ्यांना अल्पदरात भोजन व्यवस्था करावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पिंगळे यांनी उपहारगृह प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असून, मंजूर झाल्यानंतर उपहारगृह निर्मिती केली जाईल, असे सांगितले. या ऑनलाइन सभेत उपसभापती ताराबाई माळेकर, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, संजय तुंगार, विश्वास नागरे, भाऊसाहेब खांडबहाले, रवि भोये, शाम गावित, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, सचिव अरुण काळे, सहायक सचिव प्रकाश घोलप, एन.एल. बागुल, अभियंता रामदास रहाडे, लेखापाल अरविंद जैन, सोसायटी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सहभागी झाले होते.