नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असल्या, तरीही पहिली ते बारावीपर्यंतच्या अनेक शाळा आतापर्यंत ऑनलाइन सुरू होत्या. आता सुरू झालेल्या शाळांमध्येही नववी ते बारावीचेच वर्ग आहेत. मात्र, या ऑनलाइनमुळे कोवळ्या मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनामुळे सर्व जगच थांबल्याचे चित्र होते. त्यात लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याचे सांगितले जात होते, शिवाय शाळेत एकत्र जमावे लागत असल्याने संसर्गांचा प्रसार होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असते. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. याच काळात मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचा पर्याय समोर आला होता. यात अनेक शाळांनी मुलांना वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात केल्यामुळे नव्या पिढीने कोरोनाच्या संकटात डिजिटल युगात प्रवेश केला, काही वर्गाना अजूनही ऑनलाइन पद्धतीने शिकविले जात आहे. विशेषतः जी मुले लहान आहेत, त्यांनाच या ऑनलाइनवर अभ्यास दिला जात आहे. त्यात मोबाइलवर या मुलांना तासन् तास बसावे लागत आहे. काहींनी त्यात संगणकांचा वापर सुरू केला आहे, तर काही जण टीव्हीची स्क्रीन वापरत आहेत. त्यामुळे लहान मुले सातत्याने या माध्यमांसमोर राहू लागल्याने, अनेकांना डोळ्यांच्या विकारांचा त्रास जाणवून लागले आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षाच ऑनलाइन शिक्षण कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहण्याचे संकेत आहेत. आणखी किती काळ हे चालेल, हेही कोणाला सांगता येणार नाही. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास होत असून, अनेक मुले तर यात रमत नसल्याने शैक्षणिक नुकसानही होत आहे.
इन्फो-
ऑनलाइन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम
ऑनलाइन शिक्षण कोरोनामुळे एक पर्याय म्हणून समोर आला, तरी त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत. मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा एक भाग आहे. तर मुले मोबाइलच्या अति आहारी जात आहेत. मोबाइल हाताळताना इतर विंडो उघडणार नाहीत, यावर पालकांना लक्ष ठेवावे लागत असून, मोबाइलमुळे ते एकलकोंडे होण्याची भीतीही पालकांना सतावते आहे. त्याचप्रमाणे, अध्यापनात दुहेरी संवादाचा अभावही प्रकार्षाने समोर येत आहे.
इन्फो
डोळ्यांना सर्वाधिक त्रास
ऑनलाइनमुळे मुलांच्या डोळ्यांना मोठा त्रास होतो. त्यातच मुले शाळेत व्यवस्थित बसतात. मात्र, घरी बसण्याची अडचण आहे, तसेच मोबाइल वापराची सवय वाढत आहे. त्यांच्यात चिडचिडेपणा येत आहे. इतरही अनेक तक्रारी वाढत असल्याचे मत नेत्ररोग तज्ज्ञांसह बालरोग तज्ज्ञांकडूनही व्यक्त होत आहे.
कोट-
शैक्षणिक नुकसान होण्यापेक्षा बरे
कोरोनामुळे मुलांना शाळेत पाठविता येत नाही. लस येईल, तोपर्यंत मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देणे गरजेचे वाटते. यात मुलांना त्रास होत असला, तरीही इतर काही उपाय नाही.
राजेश कदम, पालक
पॉइंटर-
पहिली ते बाराबीची विद्यार्थी संख्या
पहिली - दुसरी - तिसरी - चौथी - पाचवी- सहावी- सातवी - आठवी - नववी - दहावी- अकरावी - बारावी
मुले - ६१,३२८- ६३,९३० - ६४,५१९- ६६,३९२ - ६५,२४९- ६३,५२९- ६२,३८७ - ६१,३६२ - ५९,८२४ - ५२,८०३ - ३५,६०७ - ३६.६३४
मुली - ५५,७१७- ५७,४१२ - ५६,०९९- ५७,५४७ - ५७,४९४ - ५७,११६- ५५,९४५ - ५४,५४८ - ५१,५९७ - ४६,१४६ - ३२,५५३ - ३१,२८४