औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त विविध आॅनलाइन स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.कोरोनाकाळात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत पाच दिवासांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पाच दिवस घेतलेल्या विविध आॅनलाइन स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला. बालवर्गासाठी अंकलेखन, स्व:ची ओळख, बडबडगीते गायन, इंग्रजी मूळाक्षरांचे लेखन, गणपती आरती गायन आदी स्पर्धा आदी, तर इयत्ता पहिली ते चौथीसाठी स्पेलिंग्स लेखन, चित्रकला, मी मोबाइल बोलतो या विषयावर निबंधलेखन, हस्ताक्षर आदी स्पर्धा, तसेच पाचवी ते दहावीसाठी कोरोनाग्रस्त व्यक्तीचे मनोगत या विषयावर निबंधलेखन, चित्रकला, शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करणे, लॉकडाऊन काळातील माझे दिवस या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय व तृतीयक्र मांक काढण्यात आले. मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास व्हावा व तंत्रज्ञानाची प्रभावी ओळख व्हावी म्हणून या स्पर्धा उपयुक्त ठरतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे यांनी या उपक्र माचे कौतुक केले. के. पी.पगार, शिक्षण विस्तार अधिकारी बागलाण, शाळा विकास अधिकारी सुरेश येवला, किरण सोनवणे, नंदकिशोर शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
गणेशोत्सवानिमित्त मल्हार हिल कॅम्पसमध्ये आॅनलाइन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:01 PM