नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ येत्या मंगळवारी (दि.२) ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दीक्षांत सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाइनच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या दीक्षांत सोहळ्यात २०१९ व २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल, पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. यात २०१९ व २०२० या दोन वर्षांतील एकूण पदव्यांची संख्या दोन लाख ९३ हजार ८५२ असून, त्यात पदविकाधारक ४२६१२, पदव्युत्तर पदविकाधारक ११४, पदवीधारक २ लाख १५ हजार २६९, पदव्युत्तर पदवीधारक ३५ हजार ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण दोन्ही वर्षांमिळून ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली आहे.
मुक्त विद्यापीठाचा आज ऑनलाइन दीक्षांत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:30 PM
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ येत्या मंगळवारी (दि.२) ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दीक्षांत सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाइनच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.
ठळक मुद्दे५२ स्नातकांना सुवर्णपदक : कोश्यारी, सामंत ऑनलाइन उपस्थित राहणार