शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

ऑनलाइनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 11:55 PM

पाळे खुर्द : ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित राहत असून नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिक कळवण येथे ...

ठळक मुद्देकळवण : बाहेरील नागरिकांना लस, भाजपचे निवेदन

पाळे खुर्द : ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून स्थानिक नागरिक वंचित राहत असून नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिक कळवण येथे येऊन लसीकरण करून घेत आहेत. बाहेरील नागरिकांना लस देणे बंद करून फक्त कळवण तालुक्यातील स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी करीत कळवण तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.कळवण तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दि. १ मेपासून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. शासनाने जाहीर केल्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून आपले केंद्र आरक्षित करावे लागत आहे. मात्र, कळवण तालुक्यातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसाला १०० जणांचे लसीकरण करण्यास आरोग्य विभागाला परवानगी असताना कळवण उपजिल्हा रुग्णालयात ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले नागरिक मुंबई, डहाणू, शिर्डी, नाशिक, मनमाड, सटाणा आदी शहरांमधून येऊन लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याने शासनाने लागू केलेल्या ऑनलाइन सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतला असून काही नागरिकांनी पहिला डोस घेऊन जवळ जवळ २ महिने उलटले तरी त्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने त्यांना रोज वणवण फिरावे लागत आहे.कळवण तालुक्यात फक्त उपजिल्हा रुग्णालय, नवीबेज प्राथमिक आरोग्य व ओतुर प्राथमिक आरोग्य केद्रांवर लसीकरण करण्यात येत होते; परंतु काही दिवसांपासून कळवण उपजिल्हा वगळता तेथेही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.वैद्यकीय अधीक्षक मात्र घरी...कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांच्याबद्दल नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून लसीकरणाच्या दिवशी ते केंद्रावर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी (दि.८) उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयास कुलूप दिसून आले, अधिक चौकशीत ते आपल्या घरी नाशिक येथे असल्याचे सांगण्यात आले.पहिला डोस घेऊन ४५ दिवसांच्या वर कालावधी लोटूनही अनेकांना दुसरा डोस मिळालेला नाही, त्यामुळे अनेक वयोवृद्ध नागरिक भयभीत झालेले आहेत. तसेच १८ ते ४४ वयापर्यंत गटाला ऑनलाइन जो १०० लसींचा कोटा दिलेला आहे, त्यात बरेच नाशिक, संगमनेर, शिर्डी, मनमाड येथील नागरिक लसीकरणासाठी कळवणला येत आहेत. त्यामुळे कळवणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही.- डॉ. अनिल महाजन.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल