लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्ट फोनच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची साधी स्मार्टफोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय येथे नेटवर्क अनेकदा गायब असते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले आॅनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे दिसते.सिन्नर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी शाळेच्या माध्यमातून ३४३ शाळांमधील मुलांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग, विषयानुसार सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिले जाते. मात्र हा आॅनलाईन शिक्षणाचा प्रयोग ग्रामीण भागासाठी अडचणीचा ठरत आहे.अनेक सर्वसामान्यांकडे स्मार्टफोन नाही. अनेकांकडे स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे नाहीत. फोन असणाऱ्यांकडे रिचार्ज करण्यासाठी वेळेवर पैसे नाही. अनेक गरीब कुटुंब मोलमजुरी करु न आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांनास्मार्टफोन घेता येत नाही. काहींकडे स्मार्टफोन असेल तर रेंज नसते. फोन उपलब्ध झाला, तर काही विद्यार्थी वेळेवर क्लास अटेंड करत नाहीत.शासनाने अनेक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचिवण्याची व्यवस्था केली. मात्र अनेकांकडून तशा प्रकारचे डिश नाहीत त्यामुळे या उपक्र माचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झालेला दिसत नाही. ग्रामीण भागात तरी आॅनलाईन शिक्षणाचा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही.सिन्नर तालुक्यातील ३४३ शाळांमध्ये ७०५२७ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यापैकी ३४ हजार ८८८ विद्यार्थी स्मार्टफोन द्वारे शिक्षण घेत आहे. झूम, गुगल व मिटद्वारे १९६७४, प्रत्यक्ष शिक्षण घेणारे ३८५०, पाठ्यपुस्तक व स्वाध्याय संचाद्वारे १०२५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच सह अध्यायीच्या मदतीने ८९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.कारोनामुळे शाळा बंद आहे. तरी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल मध्ये पाचवी ते दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचे सोमवार ते शनिवार शासकीय परिपत्रकानुसार नियोजन केलेले असून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.संदीप भाबड, अध्यक्ष, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटे.
आॅनलाईन शिक्षण सर्वसामान्यांपासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 3:47 PM
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्ट फोनच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची साधी स्मार्टफोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय येथे नेटवर्क अनेकदा गायब असते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले आॅनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे दिसते.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान : ग्रामीण भागात अनेकांकडे नाहीत स्मार्टफोन