शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

चांदवडला विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:23 PM

एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली.

चांदवड : येथील एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली.कोरोनाचे गडद संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या संचारबंदीने विद्यापीठे व महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. परीक्षा तोंडावर आल्या असून अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर येऊन ठेपली होती. अपूर्ण राहिलेल्या अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन टीचिंगवर प्राध्यापकांनी जोर दिला. परीक्षा कशी घ्यायची हे मोठे आव्हान होते. सर्व विद्यार्थी आपल्या घरी व शिक्षकदेखील आपापल्या घरीच आहेत. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून व्यवस्थापन मंडळ तसेच प्र्राचार्य महादेव कोकाटे व डॉ. महेश संघवी व त्यांच्या संपूर्ण चमूने ही परीक्षा गुगल क्लासरूमच्या सहाय्याने घ्यायचे ठरवले. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची बैठकदेखील आॅनलाईन घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी हे परीक्षार्थी असणार व व त्यांचे पालक हे सुपरवायझर व शिक्षक हे परीक्षक म्हणून काम करणार. या त्रिसूत्री पद्धतीने अतिशय काटेकोरपणे परीक्षेचे नियोजन करण्यात आले. त्यात आॅनलाइन-आॅफलाइन व आॅनलाइन या धर्तीवर या परीक्षेचे नियोजन केले गेले, साधारण सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढील तीन तासात विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका संपूर्णपणे सोडवून पुढच्या पंधरा मिनिटात स्कॅन करून परत आपल्या लॉगिनमधून अपलोड केल्या, व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांना त्यांच्या लॉगिनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध झाल्या. या संपूर्ण विषयांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवशी किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबतच्या प्रोजेक्ट सेमिनार इत्यादी आवश्यक बैठकादेखील आॅनलाइनच होत आहेत.

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आॅनलाइन लर्निंगसाठी उपलब्ध सर्व टुल्सचा ज्या कौशल्याने उपयोग करून घेतला तो संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एक मौलचा दगड ठरेल. विद्यार्थिदशेतच सर्व आॅनलाइन टुल्सचा उत्कृष्ट वापर केलेले विद्यार्थी उद्या इंडस्ट्रीलादेखील नवी दिशा देऊ शकतील, असा विश्वास आहे- अरविंद महापात्रा, सीईओ व को. फाउण्डर नेटविन, नाशिक

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या