नाशिक : गत काही दिवसांपासून शहर पोलिसांनी जुगार व मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरू केले असून, जुगाºयांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत़ त्यातच काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांनी सराईत जुगारअड्डे चालकांवर तडीपारीची कारवाईदेखील केली़ पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी जुगाºयांनी आता मोबाइलचा वापर सुरू केला आहे़ याच प्रकारे मोबाइलवर जुगार खेळणाºया दोघांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़सातपूरच्या समृद्धी टी पॉइंटजवळील हॉटेल गावरान ठसका या बंद हॉटेलमागे मोबाइल हॅण्डसेटवर फनगेम नावाचा रौलेट बिंगो हा आॅनलाइन जुगार पैसे घेऊन खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ नाशिक शहरातील कारवाईमुळे जुगाºयांनी आपला मोर्चा आॅनलाइन जुगारीकडे वळविला आहे़ विशेष म्हणजे या आॅनलाइन खेळाचा जुगारीच प्रचार करीत असून, यामुळे पोलिसांपासून धोका नसल्याचे सांगत आहेत़ मात्र, पोलिसांनी आता या आॅनलाइन जुगाराकडेही आपले लक्ष केंद्रित केले आहे़
नाशिकमध्ये आॅनलाइन जुगार; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:55 AM
नाशिक : गत काही दिवसांपासून शहर पोलिसांनी जुगार व मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरू केले असून, जुगाºयांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत़ त्यातच काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांनी सराईत जुगार अड्डे चालकांवर तडीपारीची कारवाईदेखील केली़ पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी जुगाºयांनी आता मोबाइलचा वापर सुरू केला आहे़ याच प्रकारे मोबाइलवर जुगार खेळणाºया दोघांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
ठळक मुद्देआॅनलाइन जुगाराकडेही आपले लक्ष केंद्रित केले फनगेम नावाचा रौलेट बिंगो हा आॅनलाइन जुगार पैसे घेऊन खेळला जात असल्याची माहिती