नाशिक : ऑनलाइन फसवणुकीत ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका भामट्याने नागरिकाला चक्क ओटीपी न विचारता आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्डवरून परस्पर तीन लाख रुपयांचे व्यवहार चोरट्याने फसवणूक केली आहे.
पाइपलाइनरोडवरील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी अनिल गोपीचंद चव्हाण (४३) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.