जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे आज ऑनलाइन ग्रामसभा नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाली. गावातील अतिशय महत्त्वाचे विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पुरणगावच्या सरपंच मंदाकिनी नानासाहेब ठोंबरे यांनी ऑनलाइन ग्रामसभेचे आयोजन केले होते.
पुरणगावचे ग्रामदैवत श्री गणरायाला वंदन करून ग्रामसभेला सुरुवात झाली. सर्वप्रथम ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा आढावा सर्व नागरिकांना करून देण्यात आला. झालेल्या खर्चाची सर्व माहिती नागरिकांना ग्रामसभेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. विविध योजनांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी आजच्या ग्रामसभेने मान्यता दिली. याप्रसंगी पुरणगावच्या सरपंच मंदाकिनी नानासाहेब ठोंबरे, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती पुरी, ग्रामपंचायत सदस्य श्रावण ठोंबरे, कल्पना ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे, कमल ठोंबरे, आशाताई वाघ आदींसह कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थितीत राहून ग्रामसभेत सहभाग घेतला.
फोटो..
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील ऑनलाइन ग्राम सभेत मार्गदर्शन करताना ग्रामसेवक श्रीमती पुरी, सरपंच मंदाकिनी ठोंबरे, रामनाथ ठोंबरे, श्रावण ठोंबरे व ग्रामस्थ.