नाशिक - कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यापासून रखडलेली महासभा आज व्हिडीओ कॉन्फरिंग द्वारे सुरू झाली आहे. महापालिकेच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे महासभा होत असून यात मोबाईल ॲप द्वारे 101 नगरसेवक सहभागी झाली आहे.दरम्यान, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी आपला पहिला अर्थसंकल्प महासभेला सादर केला. 2021 या वर्षासाठी अपेक्षित जमा 2 हजार 390 कोटी आणि अपेक्षित खर्च 2 हजार 389 कोटी गृहीत धरून 1 कोटी 30 लाख रुपयांचे शिलकी अंदाज पत्रक सादर करण्यात आले.या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारे नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच खेडे विकास आणि अन्य कामांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नाशिक महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही चालू महिन्यात महापौरांनी महाकवी कालिदास कलामंदिरात सभा घेण्याचे नियोजन केले होते मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला होता त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नवी शक्कल शोधून काढली असून प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे महासभा होत आहे अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्यानंतर देखील सुमारे एकशे एक नगरसेवक सहभागी झाले आहेत तसेच अधिकारी त्यांच्या दालनातून या बैठकीत सहभागी झाले आहेत
नाशिक महापालिकेच्या ऑनलाइन सभेत अंदाज पत्रक सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 6:43 PM
मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नाशिक महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही चालू महिन्यात महापौरांनी महाकवी कालिदास कलामंदिरात सभा घेण्याचे नियोजन केले होते मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम