माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव व निमा या नाशिक येथील औद्योगिक संघटनेचे सचिव राजेश गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपले महाविद्यालय यशाच्या विशिष्ट उंचीवर भरारी घेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षक हे राष्ट्राचे, संस्कृतीचे खरे शिल्पकार आहेत. शिक्षकांचा मला खूप अभिमान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी नवनाथ डुंबरे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले अनुभव, शिक्षक म्हणून आपली बांधिलकी व उपस्थित सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. कलाशिक्षक एस. जी. खुळे यांनी फलक लेखनातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा साकारली होती. सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, पूजा थोरात व अंकिता थोरात या विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविक व्ही. बी. पवार यांनी केले. अनुष्का सैंद्रे, समीक्षा पवार, श्रुती थोरात या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा स्काऊट समुपदेशक विश्वनाथ शिरोळे यांनी केला. यावेळी मुख्याध्यापिका एस. पी. शिंदे, आर. एस. गडाख, पी. पी. शेलार, आर. डी. कहांडळ, बी. सी. गायकर ,जी. एस. जगताप, बी. एस. शिंदे उपस्थित होते.
पंचाळे गडाख विद्यालयात ऑनलाइन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:18 AM