ओझरटाऊनशिप : कोजागिरी पैर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र लक्ष्मी मातेचे पूजन होत आहे.त्याप्रमाणेच आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असलेल्या आई,पत्नीचा सन्मान करण्याचा संकल्प करा. ''अधोगर डोक्यावर पदर,पतीच्या सेवेला सादर,भुकेल्याची कदर तीच खरी भारतीय मदर'' महिलांनी आपल्या सासूचा सन्मान करतांना आपल्या पतीला देव मानून सेवा करावी,मुलांना चांगले संस्कार द्यावे असा धर्मउपदेश अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केला.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ओझर येथील निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमात कोरोनामूळे यंदा काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाइन पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोजागिरी पौर्णिमेची माहिती दिली. यादिवशीच्या जागरणाचे महत्व भाविकांना सांगितले.मनुष्य जन्म लाभला हे अपणा सर्वांचे सर्वात मोठे भाग्य आहे.हा दुर्लभ जन्म सत्कारणी लावा.''कर्म तैसे फळ'' हे गीतेचे वचन असल्याने कर्म करतांना चांगले करा.आपण ''जन्म'' गावा कडून ''मृत्यू'' गावा कडे जात आहोत हे सैदैव लक्षात ठेवा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा.हे एकच कारण मनुष्याला जन्म घेण्याचे आहे.साधूंचे रक्षण,दुष्टांचा नाश, आणि धर्माची स्थापना या तीन कारणांसाठी देवाचा अवतार होतो.आणि वाढावया सुख,भक्ती,भाव,धर्म कुळाचार, नाम विठोबाचे या सहा कारणांसाठी संतांचा जन्म होतो. देह देवाचे मंदिर आहे.नेहमी पावित्र्यात रहा.असे सांगतानाच आपल्या घरातील आई,पत्नीस लक्ष्मी स्वरूप मानून आदर करावा.महिलांनी चूल,मूल, गाडगे,मडके इतकेच मर्यादित राहू नये.अध्यात्मिक प्रगती करावी.एक महिला संस्कारीत झाल्यास संपूर्ण कुटूंब संस्कारित होईल.असेही यावेळी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य बाबाजींच्या पादुका आणि पालखीचे पूजन संपन्न झाले. सत्संग,महाआरती,नैवेद्य, दाखवून उपस्थित भाविकांना दुध ,प्रसाद वाटण्यात आला. कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ऑनलाइन सत्संग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:10 PM
ओझरटाऊनशिप : कोजागिरी पैर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र लक्ष्मी मातेचे पूजन होत आहे.त्याप्रमाणेच आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असलेल्या आई,पत्नीचा सन्मान करण्याचा संकल्प करा. ''अधोगर डोक्यावर पदर,पतीच्या सेवेला सादर,भुकेल्याची कदर तीच खरी भारतीय मदर'' महिलांनी आपल्या सासूचा सन्मान करतांना आपल्या पतीला देव मानून सेवा करावी,मुलांना चांगले संस्कार द्यावे असा धर्मउपदेश अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केला.
ठळक मुद्देसमर्थ सदगुरू शांतिगिरी महाराज : घरातील लक्ष्मीचाही सन्मान करा