शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मंगळवारपासून शाळेची ऑनलाइन घंटा ; विद्यार्थ्यांचा नव्या तंत्रस्नेही युगात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 6:05 PM

नाशिक जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये नवीन मुला-मुलींची ‘एन्ट्री’ होणार आहे.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षाची मंगळवारपासून सुरुवातऑनलाइनच शिक्षणावरच दिवा जाणार भरनवीन विद्यार्थ्यांचा तंत्रस्नेही युगात प्रवेश

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये नवीन मुला-मुलींची ‘एन्ट्री’ होणार आहे. मात्र, आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही ऑनलाइन शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यांच्या शिक्षणाचे काय होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला गेल्या वर्षभर सुटी मिळाली होती. मागील संपूर्ण वर्ष ऑनलाइन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाही, तर माध्यमिक शाळा अवघ्या एक ते दीड महिन्यासाठी उघडल्या. पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षा न घेताच मुलांना पास करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गाचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (दि.१५) नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही पहिल्या दिवसापासूनच शाळेची ऑनलाइन घंटा ऑनलाइन पद्धतीनेच वाजणार आहे.

ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षकांना प्रशिक्षणविद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी काहीही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शाळांनी इंटरनेट, वायफाय सिस्टिम, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा पायाभूत सुविधांची तयारी केली आहे. तसेच ‘गुगल क्लासरूम’ची निर्मिती केली आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी झूम किंवा गुगल मीट या अपवर विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला आहे. मागील वर्षाचा अनुभव घेता ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात‘बालभारती’ने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधील ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच आजपासून शाळेला सुरुवात होतेय; पण ती केवळ ऑनलाइन स्वरूपात असणार आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक